शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

By विश्वास पाटील | Published: February 24, 2023 7:15 PM

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?

कागल/गांधीनगर : हालसवडे (ता. करवीर) येथील साउंड सिस्टिम व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह दोन मुलांना कसबा सांगाव (ता. कागल) येथील दूधगंगा डाव्या कालव्यात ढकलून स्वतः भोज (कर्नाटक) येथे झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडली.यामध्ये पत्नी व नऊवर्षीय मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला, तर तेरा वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप अण्णासाहेब पाटील (३८), राजश्री संदीप पाटील (३२) आणि सन्मित संदीप पाटील (९) अशी मृत्यू झालेल्यांची, तर श्रेया संदीप पाटील (१३) असे जीव वाचलेल्या मुलीचे नाव आहे. रात्री उशिरा कागल पोलिसांत खून व आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कौटुंबिक कलहातून हे कृत्य केल्याची चर्चा असून, पोलिसांनी अन्य शक्यताही गृहीत धरून तपास सुरू केला आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप पाटील शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी दुचाकीवरून पत्नी, मुलगा आणि मुलगीसह घराबाहेर पडले होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कसबा सांगावच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्याजवळ आल्यानंतर हा प्रकार घडला. दुपारी २ वाजता मुलगी श्रेया कॅनॉलच्या कठड्यावर जखमी अवस्थेत मदतीची याचना करीत रडत असल्याचे काहींनी पाहिले. कसबा सांगावमधील रियाज कलावंत, मारुती चिखलवाळे, मेहबूब नदाफ, दीपक माने यांनी तिला कॅनॉलमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेतील भांबावलेल्या या मुलीने वेगवेगळी माहिती दिल्याने खून की आत्महत्या, याबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. तिने सांगितलेल्या माहितीवरून कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. सन्मित आणि त्याची आई राजश्री यांचे मृतदेह सापडले. संदीप याचाही मृतदेह याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण रात्री ८ वाजेपर्यंत सापडत नव्हता. घटनास्थळी कोणते वाहनही नव्हते. यामुळे पोलिसांनी इतर ठिकाणीही शोध सुरू केला होता. यादरम्यान कर्नाटकातील भोजजवळ संदीप याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समजली. कालव्याला घासून हा रस्ता गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक पाणीसाठाही आहे. रस्त्यापासून वीस फूट खोल आहे. कोणताही संरक्षक कठडा नाही. याचाच फायदा घेत संशयित आरोपीने पत्नी व मुलांना कालव्यात ढकलले असावे, असे पोलिसांनी प्राथमिक अनुमान काढले आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे करीत आहेत.

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?संदीप हा डीजे व्यवसाय करत शेती सांभाळत होता. मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावामध्ये त्याचा मित्रपरिवार मोठा प्रमाणात होता. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. मग त्याने पत्नी, मुलगा आणि मुलगीसह आत्महत्या का केली? याचे कोडे त्याच्या मित्रपरिवाराला उलगडेनासे झाले आहे.वडिलांकडून घेतले दोन लाखसंदीप डीजे व्यवसायात चांगली आर्थिक उलाढाल करत होता. पण गुरुवारी संदीपने वडिलांकडून नवीन व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते.

भोजमध्ये केली आत्महत्यादुधगंगा कॅनॉलमध्ये संदीपची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह सापडले. मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी सीपीआरला रवाना करण्यात आले. सुदैवाने मुलगी बचावली, पण पत्नी राजश्री आणि मुलगा सन्मित यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. संदीपनेही भोज (ता. चिक्कोडी) येथील अरुण सदाशिव पोवार यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे