महापालिका तीन सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:30+5:302021-04-26T04:21:30+5:30
सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह- लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य पथकाने रायगड कॉलनी, तसेच साळोखेनगर येथील ...
सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह-
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य पथकाने रायगड कॉलनी, तसेच साळोखेनगर येथील नागरिकांची रविवारी रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यावेळी रायगड कॉलनी तेथील तीन व साळोखेनगर येथील तीन नागरिक कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले.
शहरात संचारबंदी असतानाही अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने तीन मोबाइल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. रायगड कॉलनी व साळोखेनगर येथे १४९ नागरिकांची चाचणी करण्यात आली.
महापालिका विभागातर्फे दीड हजार घरांचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दैनंदिन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारी १,५९२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी ८,१०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत ८६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
शहरातील सर्वेक्षण राजारामपुरी, नेहरूनगर, सुभाषनगर, बापट कॅम्प, मुक्तसैनिक वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, महाडिक माळ, रामानंदनगर, नेहरूनगर, सुभाषनगर याठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.
विनामास्क फिरणाऱ्या १३८ नागरिकांना पालिकेचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, के.एम.टी. पोलीस पथकाकडून १३८ लोकांकडून ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या १३४ लोकांकडून ६७ हजार ७००, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने चार नागरिकांकडून ४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.