‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’ प्रकल्पांसाठी मुश्रीफ यांचा ठिय्या : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:58 PM2018-11-27T13:58:21+5:302018-11-27T13:59:38+5:30
जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या मारत सरकारचा निषेध व्यक्त केला. मुश्रीफ व कुपेकर यांच्या या मागणीला कॉँग्रेस व राष्टवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला.
‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे बहुतांशी म्हणजेच ९० टक्के काम राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले आहे. नागनवाडी प्रकल्पाचे कामही ७० टक्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उचंगी प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. त्यानंतर आलेल्या युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधीच्या उपलब्धतेसह प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या बदल्यात हेक्टरी ३६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्यानुसार निधीची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी केली.
डिजिटल फलक लक्षवेधी ठरला....
विधानभवनाच्या पायºयांंवर मुश्रीफ, कुपेकर यांनी हातात डिजिटल फलक घेऊन सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘जिव्हाळ्याचे प्रकल्प रखडले...मग निधी वळविला कुणीकडे?’, ‘ हक्काच्या १२ टीएमसीपैकी एक थेंबही पाणी अडविता आला नाही, ही कसली कर्तबगारी?’ असे लिहिलेला फलक लक्ष वेधत होता.
कागल व चंदगड मतदारसंघातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना तातडीने निधी द्या, या मागणीसाठी सोमवारी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विधानभवनाच्या पायºयांवर आंदोलन केले. यावेळी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे आमदार उपस्थित होते.