इचलकरंजी : शहरासाठी आवश्यक असलेल्या वारणा नळ योजनेसाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी आणण्यामध्ये आपले योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो-उदो करीत माझी बदनामी करीत आहेत. या योजनेला माझा विरोध नाही. दानोळीकरांच्या मनातील शंका दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत असताना खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील २७ शाळांना संगणक प्रदान आणि विविध अशा ९६ ठिकाणी कूपनलिका खुदाई प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार शेट्टी बोलत होते.गेल्या चार वर्षांपासून इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र, वारणाकाठच्या ग्रामस्थांचा या योजनेला विरोध आहे. त्या विरोधामागच्या अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे; पण वारणा नदीतील पाणी वाटपाबाबत असलेली वस्तुस्थिती पाटबंधारे खात्याने जनतेसमोर स्पष्ट केली पाहिजे. ज्यातून गैरसमज दूर होतील, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. सुरेश पाटील यांनी स्वागत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष विजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉँग्रेसचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुनील पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, राजू बोंद्रे, माजी जि. प. सदस्य जयकुमार कोले, गोवर्धन दबडे, अलका खोचरे, शिवाजी माने, आदींनी आपले विचार मांडले.कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षभगवान काटे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती शुभांगीशिंदे, सावकार मादनाईक, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, आप्पा बेडगे, राजाराम देसाई, नितीन कोकणे, आदींसह नागरिक उपस्थित होते.शेतकºयांनासुद्धा आरक्षण द्यावेकार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी यांनी शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील आर्थिक निकषावर आरक्षण याचा धागा पकडला व ते पुढे म्हणाले, बहुसंख्य शेतकरी सर्वसामान्य आहेत. त्यामुळे शेतकºयांनासुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण देणे, ही आता काळाची गरज आहे.
यंत्रमाग उद्योग वाºयावरकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, तर राज्य सरकारनेसुद्धा वस्त्रोद्योग धोरण जाहीर करताना यंत्रमाग उद्योगाला वाºयावर सोडले आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमाग उद्योगाला वीजदराची सवलत व कर्जावरील व्याजदरात सूट देण्याची दिलेली ग्वाहीसुद्धा आता पोकळ ठरली आहे, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी यावेळी केली.