राष्ट्रवादीने 'हातकणंगले' सोडला अन् 'स्वाभिमानी' हात आघाडीला जोडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:57 PM2018-11-24T12:57:51+5:302018-11-24T13:02:54+5:30
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे,
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे, असे संकेत देत कोल्हापूरचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दोन्ही कॉँग्रेसवर असल्याचे राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याचे स्पष्ट करणाऱ्या पवार यांनी उमेदवारांबाबत मात्र कोणतेच भाष्य केले नाही. किंवा खासदार महाडिक हेच पक्षाचे उमेदवार असतील असेही स्पष्ट केले नाही.
कोल्हापूरच्या जागेवर कॉँग्रेसने दावा केला असून खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतूनच उघड विरोध असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले,‘कॉँग्रेसने दावा केल्याचे आपण वृत्तपत्रांतच वाचले. येथे कोण काय म्हणाले तरी ‘कोल्हापूर’चा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदार दोन्ही कॉँग्रेसची आहे. कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी कोणीही टोकाची भूमिका घेणार नाही.’
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उपमहापौर महेश सावंत, व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल साळोखे, रोहित पाटील, आदिल फरास, आदी उपस्थित होते.
‘नियमन रद्द’चा निर्णय घातकच
बाजार समित्यांच्या नियमन रद्दबाबत राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती केली. यामुळे शेतकºयांचा संपूर्ण माल व्यापाºयांनी खरेदी केलाच पाहिजे, असे बंधन राहिलेले नसल्याने हा निर्णय शेतकºयांच्या दृष्टीने घातक असल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार-मुश्रीफ बंद खोलीत चर्चा
अधिवेशनामुळे आमदार हसन मुश्रीफ शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात शरद पवार व मुश्रीफ यांची बंद खोलीत चर्चा झाली. त्यावेळी खासदार महाडिक विश्रामगृहातील जुन्या सूटमध्ये बसून होते.