आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:53+5:302021-09-08T04:28:53+5:30
तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीवेळी अडचणी येतात. याचा परिणाम कार्यकारिणी जाहीर होण्यावर झाला आहे. ...
तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीवेळी अडचणी येतात. याचा परिणाम कार्यकारिणी जाहीर होण्यावर झाला आहे. आजही कोळींद्रे विभागाची आढावा बैठक महागावला तर उत्तूर विभागाची बैठक उत्तूरमध्ये मंत्रीमहोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यामुळे त्या विभागातील कार्यकर्ते बैठकीला आले नाहीत, असे स्वागत व प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनी सांगितले.
आजरा तालुक्यासह शहर कार्यकारिणी करावी. युवा कार्यकर्त्यांना पक्षबांधणीत संधी द्यावी. गावात व घराघरांत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला पाहिजे. त्याचा आगामी निवडणुकीसाठी उपयोग होतो, असे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी सांगितले. आमच्यातही भांड्याला भांडं लागलं. मात्र, ते सगळं विसरून सर्व कार्यकर्ते एकत्र आले पाहिजेत तरच पंचायत समितीच्या सहा व जिल्हा परिषदेच्या ३ जागा राष्ट्रवादीचे असतील, असेही पाटील यांनी सांगितले.
मेळाव्यास उदय पवार, सुधीर देसाई, एम. के. देसाई, राजू होलम, संभाजी पाटील, रणजित देसाई, पांडुरंग दोरुगडे, जनार्दन बामणे, बाबासाहेब देशमुख, यासीन मुजावर, निहाल कलावंत, अनिरुद्ध गाडवी,अमोल कुंभार, शुभम पाटील, रचना सुतार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंपी समर्थक गैरहजर....
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, तीन नगरसेवक यासह प्रमुख कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. याची बैठकीनंतर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
फोटो ओळी : आजऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत बोलताना ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उदय पवार, बाबासाहेब देशमुख, यासीन मुजावर, रचना सुतार आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०७०९२०२१-गड-०९