: कागल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विवेक विलास लोटे यांची आज बारा विरुद्ध सहा मतांनी निवड करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने मत विचारून झालेल्या या मतदानात लोटे यांना बारा तर भाजपच्या दीपाली भुरले यांना सहा मते मिळाली. भाजपचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. मुख्याधिकारी पंडित पाटील, मावळते उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक पीठासनावर उपस्थित होते. निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नगरपालिका सभागृहात झालेल्या सत्कार सोहळ्यात जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, प्रवीण काळबर यांची भाषणे झाली. चंद्रकांत गवळी, रमेश माळी, प्रकाश नाळे, सदाशिवराव पिष्टे, गणेश कांबळे, संजय चितारी, गंगाराम शेवडे, गणेश सोनुले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अपक्ष आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.