बुबनाळ : जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी अतिरिक्त खताचा व बेसुमार पाण्याचा वापर टाळावा. जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकून राहण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळणे टाळावे. त्या पाल्याची कुट्टी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेणखताची गरज भरून काढली जाते, असे मत दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
शिरोळ तालुक्यातील चौदाशे एकर शेतीमध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजना श्री दत्त कारखाना व जयसिंगपुर-उदगाव बँकेच्या सहकार्याने अमलात येत आहे. औरवाड व बुबनाळ येथील तीनशे एकर जमिनीच्या कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा, सरपंच आशरफ पटेल, शमशुद्दीन पटेल, मुस्ताक पटेल, सुभाष शहापुरे, कीर्तीवर्धन मरजे, अशमत पटेल, कादर पटेल, रहिमतुला चौगुले, अनिल आगरे, जयवंत कोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते .
कोट -
आमच्या जमिनी वर्षानुवर्षे अतिरिक्त पाण्याने नापीक बनत चालल्या होत्या. त्या जमिनीसाठी क्षारपड जमीन सुधारणा योजनेमुळे उदगाव-जयसिंगपूर बँकेच्या आर्थिक साहाय्याने व श्री दत्त कारखान्याच्या पाठिंब्याने पुन्हा लागवडीखाली आल्या. त्यामुळे गणपतराव पाटील यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्यामुळेच या भागात दुसरी हरितक्रांती होत आहे.
- शमशुद्दीन पटेल, शेतकरी औरवाड
फोटो - २४०३२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - औरवाड (ता. शिरोळ) येथील क्षारपड जमिनीची पाहणी करण्यात आली. यावेळी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शमशुद्दीन पटेल, श्रीशैल हेगाणा, सरपंच आशरफ पटेल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.