उदगावचे जयसिंगपूर येथील शाखेत ४००० खातेधारक, तर १६०० पेन्शनधारक आहेत. त्यामुळे उदगाव चिंचवाडसह परिसरातील खातेधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तीन वर्षांपूर्वी त्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अजूनही प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे उदगाव येथे शाखा सुरू झाल्यास सोयीस्कर होणार आहे. ज्या गावात शाखा नाहीत त्या गावातील विकास सोसायटीला तत्काळ मिनी एटीएम देणार आहोत, असेही ते म्हणाले. त्यामुळे गावात लवकरच मिनी एटीएम दाखल होणार आहे.
चौकट-
जयसिंगपूर शाखेवर मोठा भार
जयसिंगपूर येथे असलेल्या केडीसीसी शाखेला जयसिंगपूर, उदगांव, चिंचवाड, उमळवाड, कोथळी, तमदलगे, संभाजीपूर, कोंडिग्रे, जैनापूर व चिपरी अशा १० गावांचा भार आहे. संजय गांधी निराधार व इतर योजनेची, शाळा व शिक्षकांची, विकास सेवा सोसायट्या, पाणीपुरवठा संस्था, नियमित व चालू खाती, दूध संस्था, बचत गट यासह विविध अशी ३० हजारांहून अधिक जयसिंगपूर शाखेत खातेदार आहेत.