स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:40+5:302021-03-18T04:24:40+5:30

कोल्हापूर : स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. दोषींना शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी त्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन ...

New technology should be used to prevent female feticide | स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

Next

कोल्हापूर : स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. दोषींना शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी त्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन अभिमान वाटावा असे काम करण्याची आणि जनजागृतीची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बुधवारी केले.

पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. गोरख मंद्रुपकर, विधि व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश पंकज देशपांडे, डॉ. गीता पिल्लई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.

संजयसिंह चव्हाण म्हणाले, गर्भलिंग निदान चाचणीच्या माहितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सायलेंट ऑब्झर्व्हरचा वापर केला होता. जिल्ह्याने यात खूप मोठे योगदान दिले आहे. मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागेल. सीमाभागात भ्रूणहत्या होते का, त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात डॉ. वेदक यांनी ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करू या, देश समृद्ध बनवू या’ या सेल्फी पॉईटबाबत माहिती दिली. पुढच्या सत्रात डॉ. मंद्रुपकर यांनी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायदा अंमलबजावणी व त्यातील अडथळे याची माहिती दिली. मौलाना शेख, प्रियदर्शनी चोरगे यांनी मार्गदर्शन केले.

यांच्या पाठीवर थाप...

कोडोली येथे स्टिंग ऑपरेशन करून डॉक्टरवर कारवाई करण्यात सहभागी झालेले पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलीस उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस अभिजित घाडगे, पूजा सूर्यवंशी, गीता हसूरकर, सुनील गायकवाड, डॉ. हर्षला वेदक, संजीव बोरगे, दिलीप जाधव, पीसीपीएनटीडी सल्लागार ॲड. गौरी पाटील यांचा गौरव करण्यात आला.

---

फोटो नं १७०३२०२१-कोल-संजयसिंह चव्हाण

ओळ : कोल्हापुरात बुधवारी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयेाजित कार्यशाळेचे व सेल्फी पॉइंटचे उद‌्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. हर्षला वेदक, डॉ. गीता पिल्लई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

---

Web Title: New technology should be used to prevent female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.