सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Published: January 9, 2017 11:29 PM2017-01-09T23:29:11+5:302017-01-09T23:29:11+5:30

पुढील वर्षापासून कार्यवाही : २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार

Ninth course with sevens will change | सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

Next

भरत शास्त्री -- बाहुबली---आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) राज्यातील सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार असून, त्याबद्दलची आवश्यक पूर्तता करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिर्ती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार आहेत. तसे आदेश ‘बालभारती’ने दिले आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान व भाषा या विषयांतील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व प्राथमिक शिक्षण आराखडा २०१२ सुधारित निकषांनुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र, यंदा इयत्ता सातवी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.


सातवी ते दहावी : अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर
१ गेल्या काही वर्षांत अनेक इयत्तांची पुस्तके बदलली आहेत. बदललेली पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला योग्य वेळेत मिळत नसल्याबाबत नेहमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शाळा सुरू होऊनसुद्धा पुस्तके न मिळण्याची परंपरा यंदा तरी खंडित होईल का, हे जूनमध्येच कळेल.
२ नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य, तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते ज्युनिअर कॉलेजस्तरांवरील अभ्यासक्रमांच्या निर्मिर्तीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे जबाबदारी विभागून देण्यात आली होती.
३ यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मिर्तीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मिर्तीसाठी एकाच अभ्यास मंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Ninth course with sevens will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.