इचलकरंजीत अंगणवाडीसेविका व मदतनीसांची पोषणाहार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:55+5:302021-09-08T04:28:55+5:30

इचलकरंजी : येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून बीट क्र. २ मधील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी पोषणाहार रॅली काढली. ...

Nutrition rally of Anganwadis and helpers in Ichalkaranji | इचलकरंजीत अंगणवाडीसेविका व मदतनीसांची पोषणाहार रॅली

इचलकरंजीत अंगणवाडीसेविका व मदतनीसांची पोषणाहार रॅली

Next

इचलकरंजी : येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून बीट क्र. २ मधील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी पोषणाहार रॅली काढली. राष्ट्रामध्ये १ ते ३० सप्टेंबर हा पोषण माह पाळला जात असल्याने या रॅलीचे आयोजन केले होते. सेविका व मदतनीसांनी ‘सही पोषण देश रोशन, माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशा घोषणा दिल्या.

आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम सकस आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि अशा आहारामधूनच निरनिराळे पोषण आपल्याला मिळत असते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये पोषणतत्त्व आणि आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा पोषण माह सुरू करण्यात आला. या वेळी भागातील मुले, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना स्वस्थ पोषणचे महत्त्व सांगितले. तसेच मुलांची वजन उंची घेण्यात आली असून, कोविड १९ लसीकरणाबाबतही प्रबोधन केले. तीव्र कुपोषित व ० ते ६ वयोगटामध्ये आहार कोणता असावा, याबाबत माहिती दिली.

या वेळी सीडीपीओ सुहास बुधवले व मुख्य सेविका मंजुळा वाघमारे यांनी राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत घेण्यात येणाºया विविध कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उज्ज्वला तोडकर,आश्विनी खानाज, निलम लिपारे,दीपा कवडे, कल्पना कांबळे, विशाखा मांगलेकर, राजश्री जगताप, आदींसह सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

०७०९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पोषण आहार रॅली काढली.

Web Title: Nutrition rally of Anganwadis and helpers in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.