सायकल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:26 AM2021-03-17T04:26:25+5:302021-03-17T04:26:25+5:30

एका यंत्रमाग कारखानदारास अटक लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून ...

One died in a beating on suspicion of stealing a bicycle | सायकल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

सायकल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Next

एका यंत्रमाग कारखानदारास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून एका वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला. अलीम रशीद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गत आठवड्यात अल्ताफ शेख याची सायकल चोरीला गेली. त्याने परिसरात शोध घेऊनही त्याला सायकल सापडली नाही. चौकशीमध्ये अलीम गदवाल याने सायकल चोरून विकल्याची माहिती अल्ताफ याला समजली. यामुळे त्याने अलीम याच्याकडे सोमवारी (दि. १५) रात्री विचारणा केली. त्यावेळी अलीम हा मद्यधुंद अवस्थेत होता. उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने संतप्त झालेल्या अल्ताफ याने अलीमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अलीमचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

मंगळवारी सकाळी ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना प्राथमिक चौकशीत मृतदेह अलीम याचा असल्याचे समजले. तसेच रात्री अलीम व अल्ताफ यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांना सुगावा लागल्याचे समजताच अल्ताफ याने पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. दरम्यान, अलीम याच्या पत्नीने शहापूर पोलीस ठाण्यात अल्ताफ याच्यासह इतर साथीदारांनी सायकल चोरीच्या संशयावरून ठार मारल्याची तक्रार दिली आहे. त्यामध्ये अल्ताफ याने अलीम याची पत्नी जयदा यांना फोन करून तुझ्या पतीने सायकल चोरली असून, दोन सायकलींचे पैसे द्यावे लागतील; अन्यथा त्याला मारणार, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.

Web Title: One died in a beating on suspicion of stealing a bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.