घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार खोराटे हे नेहमीप्रमाणे दूध संस्था तपासण्यासाठी सकाळी लवकर घरातून बाहेर पडले होते. दरम्यान, ढेंगेवाडी याठिकाणी आल्यानंतर रस्त्याच्याकडेला टाकलेले शेण पावसामुळे रस्त्यावर वाहून आले होते. त्याच्यावरुन त्यांची मोटारसायकल घसरून ते खाली पडले. या अरुंद मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याकडेला शेणाचे ढीग, लाकडे, दगडे यांचे ढीग आहेत. आतापर्यंत या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वाहन चालवताना चालकाला कसरत करावी लागते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.एखाद्याचा जीव गेल्यावरच रस्त्याकडील अतिक्रमणे काढणार का, असा संतप्त सवाल या मार्गावर नियमित प्रवास करणारे नागरिक व चालक करत आहेत.
१४ सोळांकुर
फोटो ओळ-
ढेंगेवाडी, ता. राधानगरी येथे रस्त्याच्याकडेला टाकलेल्या शेणामुळे अपघात झालेली मोटरसायकल.