म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:35 AM2021-06-10T11:35:34+5:302021-06-10T11:37:17+5:30

Mucormycosis CoronaVirus In Kolhapur : म्युकरमायकोसिसच्या एका रूग्णाचा येथील खासगी रूग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रूग्णालयात १०१ जणांवर उपचार सुरू आहेत.

One patient of Mucker dies, 101 treated | म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार

म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देम्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू१०१ जणांवर उपचार

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या एका रूग्णाचा येथील खासगी रूग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रूग्णालयात १०१ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात सध्या म्युकरच्या रूग्णांचा सीपीआरवर ताण असून, याठिकाणी ७६ जणांवर उपचार सुरू आहेत. ३४ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत जिल्ह्यातील एकूण १० रूग्णालयांना म्युकरचे उपचार करण्यासाठी महात्मा फुले योजनेतून परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजनमधूनही सीपीआरसाठी म्युकरच्या औषधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

मात्र, सर्वच रूग्णालयांत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार एका रूग्णालयात आणि शस्त्रक्रिया दुसऱ्या रूग्णालयात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: One patient of Mucker dies, 101 treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.