अंतिम वर्षाच्या ३९ हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:13 AM2020-11-04T10:13:05+5:302020-11-04T10:14:34+5:30
Education Secto, online, exam, kolhapur, shivajiunivercsity शिवाजी विद्यापीठातील बी. टेक., एम. एस्सी., एम. ए., बीसीए, अशा विविध ३२ अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ३९०१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ८९१० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा शनिवार (दि. ७) ते दि. १२ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याबाबतचा तपशील गुरुवारी (दि.५) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बी. टेक., एम. एस्सी., एम. ए., बीसीए, अशा विविध ३२ अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ३९०१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ८९१० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा शनिवार (दि. ७) ते दि. १२ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याबाबतचा तपशील गुरुवारी (दि.५) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.
विद्यापीठाकडून मंगळवारी दिवसभरात तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात देण्यासाठी ३९६५५, तर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी ९६३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण ४७९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पी. जी. डिप्लोमा इन ई-बिझनेस, डिप्लोमा इन रशियन, हायर डिप्लोमा इन रशियन, पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नोलिझम, एलएलएम अंतिम वर्ष या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला.
परीक्षेसाठी लॉगिन करताना दमछाक
पेपर सुरू होण्यास १५ मिनिटे बाकी असताना परीक्षार्थींना लॉगिन होण्याची लिंक उपलब्ध होते. सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांची लॉगिन करताना मंगळवारी दमछाक झाली. काही पेपर सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी, काहीजण पेपर सुरू झाल्यानंतर लॉगिन झाले.