राजाराम कारखाना -तक्रारदारांना म्हणणे सादर करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:14 PM2020-11-11T17:14:01+5:302020-11-11T17:16:53+5:30
Mahadevrao Mahadik , rajaramsugerfactory, kolhapurnews कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वाढीव सभासद अपात्रतेविरोधात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी मुंबईत सुनावणी होऊन तक्रारदारांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वाढीव सभासद अपात्रतेविरोधात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी मुंबईत सुनावणी होऊन तक्रारदारांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.
राजाराम कारखान्याच्या वाढीव सभासदाविरोधात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्याकडून प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. तत्कालीन साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी वाढीव सभासदांच्या कागदपत्रांची पडताळणी करून १४२५ जणांना अपात्र ठरवले होते. तानाजी चव्हाण, अनंत पाटील, रविंद्र रेडेकर, तानाजी आनंदा चव्हाण व किरण भोसले या अपात्र सभासदांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.
मनाई अर्ज व मूळ तक्रारीवर एकत्रीत सुनाावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होती. सुनावणी दरम्यान, मूळ तक्रारदारांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. तक्रादारांच्या वतीने ॲड. लाड यांनी तर अपिलकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश शहा यांनी बाजू मांडली. प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांनीही बाजू मांडली.