‘जलयुक्त’च्या चौकशीचे आदेश

By admin | Published: May 26, 2017 01:06 AM2017-05-26T01:06:11+5:302017-05-26T01:06:11+5:30

साखरी-म्हाळुंगे प्रकरण : आंदोलक-अधिकाऱ्यांचे एकमेकांवर आरोप

Order of Water Supply inquiry | ‘जलयुक्त’च्या चौकशीचे आदेश

‘जलयुक्त’च्या चौकशीचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील साखरी-म्हाळुंगे येथे जलयुक्त शिवारच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची कोल्हापूर जिल्ह्यात कसे तीन-तेऱ्हा वाजविले जात आहेत याचे उदाहरणच समोर आले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन बुधवारी या कामांची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी कृषि अधिकारी नामदेव परीट यांना मोबाईल लावून त्याचा स्पीकर सुरू केला आणि चक्क शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच पैसे देण्याची आॅफर दिली. बंधाऱ्यासाठी मुरूम वापरण्यात आला असून भरावासाठी टोकदार दगड वापरणे आवश्यक असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.
अशातच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे आणि कृषि अधिकारी नामदेव परीट हे तिघेही एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत; या प्रकारणी उपविभागीय कृषि अधिकारी विजय धुमाळ यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Order of Water Supply inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.