कोल्हापूर : गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. तसेच शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे संजय मेंटेनन्स या संस्थेचे कर्मचारी पुढील आठवड्यात मंदिराच्या स्वच्छतेसाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
यंदा नवरात्रोत्सव ७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, उत्सवाला पंधरा दिवस राहिल्याने सर्वत्र सणाची लगबग चालू आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी या काळात २५ लाखांवर भाविक येतात. पण गेल्यावर्षीपासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने मंदिरे अजूनही बंद आहेत, नवरात्राेत्सवातदेखील दरवाजे खुले करण्यात येणार नाहीत. सध्या मंदिराच्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई सुरू आहे. शिखरांची रंगरंगोटी करण्याआधी पूर्वीचा रंग काढून टाकण्यात येत आहे. दगडी भिंतींवर पाणी मारले जात आहे. गेल्या दहा - बारा वर्षांपासून मुंबईतील संजय मेंटेनन्स या कंपनीच्यावतीने मंदिराची मोफत साफसफाई करून दिली जाते. पुढील आठवड्यात ही टीम कोल्हापुरात येणार आहे.
---
फोटो नं २३०९२०२१-कोल-अंबाबाई०१
ओळ :
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२
मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी केली जात आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)