धैर्यशील मानेंची रूईतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:32+5:302021-05-10T04:24:32+5:30

इंगळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी रूई (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कोरोना रोखण्यासाठी ...

Patient Mane visits the primary health sub-center in Rui | धैर्यशील मानेंची रूईतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट

धैर्यशील मानेंची रूईतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट

Next

इंगळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी रूई (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी मंडल अधिकारी अरुण पुजारी, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, तलाठी गणेश आवळे, आरोग्यसेवक उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्यांकडून कडक उपाययोजना राबविण्यात यावी. रूई गावासाठी जादा लस उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य अजिम मुजावर, भाऊसाहेब फास्के, जयसिंग शिंदे, प्रा. राजाराम झपाटे, संजय मगदूम, जितेंद्र यादव, राजू बेनाडे, आदींनी सूचना मांडल्या. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत कुलकर्णी, आनंदा झपाटे, अविनाश शिंदे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Web Title: Patient Mane visits the primary health sub-center in Rui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.