इंगळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी रूई (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी मंडल अधिकारी अरुण पुजारी, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, तलाठी गणेश आवळे, आरोग्यसेवक उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्यांकडून कडक उपाययोजना राबविण्यात यावी. रूई गावासाठी जादा लस उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य अजिम मुजावर, भाऊसाहेब फास्के, जयसिंग शिंदे, प्रा. राजाराम झपाटे, संजय मगदूम, जितेंद्र यादव, राजू बेनाडे, आदींनी सूचना मांडल्या. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत कुलकर्णी, आनंदा झपाटे, अविनाश शिंदे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.