कबनुरात सार्वजनिक गणपतींचे शांततेत विहिरीत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:52+5:302021-09-21T04:25:52+5:30
कबनूर : ग्रामपंचायत व प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या व घरातील गणेशमूर्तींचे शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात ...
कबनूर : ग्रामपंचायत व प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या व घरातील गणेशमूर्तींचे शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात मिरवणूक न काढता, गावातील बंद असलेल्या विहिरीमध्ये विसर्जन केले.
सरपंच शोभा पोवार यांनी, कोणीही नदीला गणपतीचे विसर्जन करू नये. गावातीलच बंद असलेल्या विहिरीमध्ये गणरायाचे विसर्जन करावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत, नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन देशभक्त रत्नापाण्णा कुंभार चौक, आभार फाटा व पंचगंगा साखर कारखाना या ठिकाणी निर्माण केलेल्या विसर्जन कुंडांमध्ये केले. दरवर्षी रत्नाप्पाण्णा कुंभार चौकामध्ये सर्वच मंडळांचे गणपती येऊन विसर्जनासाठी जातात, परंतु यावेळी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने मोजकेच गणपती चौकातून विसर्जनस्थळी गेले. सार्वजनिक गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाची मूर्ती गावातील वापरात नसलेल्या विहिरीमध्ये भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन केले. कोणत्याही मंडळाने विसर्जन मिरवणूक न करता शांततेत विसर्जन करणे पसंत केले.