एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघास अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:42+5:302021-03-25T04:23:42+5:30

इचलकरंजी : येथील आचार्य श्री आनंद युवा मंचच्या वतीने आयोजित एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघाने अजिंक्यपद ...

Peritus Riders win the AYM JPL Halfpitch Cricket Tournament | एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघास अजिंक्यपद

एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघास अजिंक्यपद

Next

इचलकरंजी : येथील आचार्य श्री आनंद युवा मंचच्या वतीने आयोजित एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघाने अजिंक्यपद पटकावले, तर फ्रेंड्‌स फॉर एव्हर संघ उपविजेता ठरला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेस क्रिकेटप्रेमींनी प्रतिसाद दिला.

विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

गेल्या सहा वर्षांपासून आचार्य श्री आनंद युवा मंचच्या वतीने ही स्पर्धा भरविली जात आहे. यंदा स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये फ्रेंड्‌स फॉर एव्हर, प्रसन्न बॉईज, युनिटी स्पोर्टस् व पेरीटस रायडर्स या चार संघांनी साखळी सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये फ्रेंड्‌स फॉर एव्हर विरुद्ध प्रसन्न बॉईज यांच्यातील सामना फ्रेंडस् फॉर एव्हरने जिंकला, तर युनिटी स्पोर्टस् व पेरीटस रायडर्स यांच्यातील लढत रंगतदार झाली. दोन्ही संघांची धावसंख्या समान झाल्याने सुपरओव्हर घेण्यात आली. त्यामध्ये पेरीटस रायडर्सने हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पेरीटस रायडर्सने दिलेले १०९ धावांचे लक्ष्य पेलताना फ्रेंड्‌स फॉर एव्हर संघाने शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना ९४ धावाच करता आल्याने पेरीटस रायडर्सने एवायएम जेपीएल चषकावर आपले नाव कोरले.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सुनील मुंदडा, दिलीप मुथा, अरुण ललवाणी, प्रवीण कांकरिया, सुभाष जैन, श्रीकांत चंगेडिया आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२४०३२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजी येथील आचार्य श्री आनंद युवा मंचच्या वतीने आयोजित एवायएम जेपीएल हाफपीच क्रिकेट स्पर्धेत पेरीटस रायडर्स संघाने अजिंक्यपद पटकावले. संघास मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले.

Web Title: Peritus Riders win the AYM JPL Halfpitch Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.