अभिजित गुर्जर यांची छायाचित्रे अमेरिकेतील ‘फोटोवाॅक’ प्रदर्शनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:41+5:302021-06-21T04:16:41+5:30
अमेरिकेतील या प्रदर्शनासाठी जगभरातील निवडक १२ छायाचित्रकार-पत्रकारांच्या छायाचित्रांची निवड झाली आहे. त्यात कोल्हापूरच्या अभिजित यांच्याही १५ छायाचित्रांचा समावेश आहे. ...
अमेरिकेतील या प्रदर्शनासाठी जगभरातील निवडक १२ छायाचित्रकार-पत्रकारांच्या छायाचित्रांची निवड झाली आहे. त्यात कोल्हापूरच्या अभिजित यांच्याही १५ छायाचित्रांचा समावेश आहे. अभिजित हे गेल्या पाच वर्षांपासून अशा विविध विषयांवर छायाचित्रे व लेख आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना गेल्या वर्षी ‘फोटो साऊथ एशिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. जगभरातील नागरी हक्क आणि समानतेसाठी सुरू असलेल्या संघर्षावर आधारीत सामाजिक विषयावर फोटावाॅकने यावर्षी प्रदर्शन भरविले आहे. यात अभिजित यांच्या आशा वर्कर विषयावरील ‘सिस्टर्स ऑफ होप’ असा विषय धरून टिपलेल्या १५ छायाचित्रांचा समावेश आहे. यासाठी त्यांना आशा युनियनच्या अध्यक्षा नेत्रदीपा पाटील, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार संपादक शमिंदर दुलाई यांचे सहकार्य लाभले आहे. फोटो : १९०६२०२१-कोल-अभिजित गुर्जर प्रदर्शन फोटो
आेळी : अमेरिकेतील सिएटल
येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फोटोवाॅक छायाचित्र प्रदर्शनात अभिजित गुर्जर यांचे कोल्हापुरातील
आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्व्हे करतानाचे टिपलेले छायाचित्र.
फोटो : १९०६२०२१-कोल-अभिजित गुर्जर
फोटो 1. Abhijeet Gurjar.jpg – आयकार्ड फोटो
2. Abhijeet Gurjar Pradarshan Photo.jpg कॅप्शन अमेरिकेतील सिएटल
येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फोटो प्रदर्शनात लावण्यात आलेला कोल्हापुरातील आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्व्हे करतानाचा फोटो लावण्यात आला आहे.