पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षांची २५ मेपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:21+5:302021-05-11T04:25:21+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रथम सत्राच्या परीक्षांची सुरुवात दि. २५ मेपासून होणार आहे. या परीक्षा ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रथम सत्राच्या परीक्षांची सुरुवात दि. २५ मेपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होतील. त्यामध्ये एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी, आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठातील विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथमसत्राचे प्रवेश उशिरा झाले. त्यामुळे त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू करण्यात आल्या नव्हत्या. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. २५ मेपासून ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयानुसार एम.ए. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, गृहशास्त्र, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, रशियन, एम.ए. मास कम्युनिकेशन, बीजेसी, बी.लिब., एम.लिब., एम.एस्सी., केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, नॅॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मॅॅथ्स, जिऑलॉजी, एम.कॉम., एम.ए. योगा सत्र एक, मास्टर ऑफ व्हॅल्युएशन, एमसीए., वायसीएसआरडी आदी विविध अभ्यासक्रमांच्या ५७ परीक्षा होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सोमवारी देण्यात आली आहे.
चौकट
२५ प्रश्नांसाठी एक तासाची वेळ
विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार या परीक्षेतील ५० गुणांसाठी २५ बहुपर्यायी (एमसीक्यु) प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न ऑनलाईन स्वरूपात सोडविण्यासाठी एक तासाची वेळ असणार आहे. दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत परीक्षा होईल, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.