नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 08:16 PM2021-02-19T20:16:00+5:302021-02-19T20:16:42+5:30

cinema Kolhapur- नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ आणि अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जमा झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

Preserve the value of Natashreshtha Jaishankar Danve to the National Film Museum | नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ ठेवा दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जयश्री दानवे, राजदर्शन दानवे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ आणि अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जमा झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे दानवे हे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. पुण्यात जन्मलेले दानवे यांनी अगदी सुरुवातीला मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली आणि त्यानंतर १९३० च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम केले. साठ वर्षे अभिनय कलेची सेवा केली आणि स्वत:ची अशी विशिष्ट व्यक्तिरेखा खलनायकाच्या रूपाने मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावर साकार केली.

दानवे यांनी सात चित्रपटांतून कामे केली. त्यांचा नाट्यसंसार १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग इतका विस्तृत होता. सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांच्या 'सावकारी पाश' (१९३६), भालजी पेंढारकर यांच्या 'सासुरवास' ( १९४६), 'मीठभाकर' (१९४९), 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३ ), 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) आणि दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' (१९७३), आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय होत्या. 'असिरे हवीश' या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. १९३० आणि १९४० च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली.

दुर्मीळ छायाचित्रे, वस्तूंचा समावेश

दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहात असंख्य दुर्मीळ छायाचित्रे, हँडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका, वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख, जुनी कागदपत्रे, अनेक पुस्तके, त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके तसेच ते काम करीत असलेल्या हॅम्लेट (१९३३) या नाटकातील काही विग्स, मिशा, आदी वस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील छायाचित्रे प्रामुख्याने कृष्णधवल असून, सुमारे २५० छायाचित्रे दानवे यांनी अभिनय केलेल्या चित्रपट आणि नाटकांमधील आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन इतर अभिनेत्यांची ५१ छायाचित्रे आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपट आणि नाटकांतील १५ बाय १२ आकाराच्या सुमारे चाळीस मोठ्या फ्रेम्सही आहेत.

 


भारतीय चित्रपटसृष्टीतील एका 'युगा'तील एका ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा दानवे कुटुंबीयांनी मोठ्या परिश्रमाने जतन करून ठेवलेला हा दुर्मीळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून, त्याचा संशोधकांना खूप उपयोग होणार आहे.
प्रकाश मगदूम,
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक, पुणे.


दिग्दर्शक म्हणून तांत्रिकदृष्ट्या तेव्हा अशक्य असलेले अनेक प्रयोग त्यांनी स्टेजवर केले. याची साक्ष म्हणजे कोल्हापूरच्या जीवन कल्याण या संस्थेची अगणित नाटके. दानवे परिवारातर्फे गेली ३३ वर्षे त्यांची स्मृती जतन केली आहे.
- जयश्री जयशंकर दानवे,
कोल्हापूर

 

Web Title: Preserve the value of Natashreshtha Jaishankar Danve to the National Film Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.