बिद्री कारखान्याचा अध्यक्ष भाजपचाच असेल

By Admin | Published: March 15, 2017 12:14 AM2017-03-15T00:14:13+5:302017-03-15T00:14:13+5:30

चंद्रकांत पाटील : शिवडाव-सोनवडे घाटाचे काम पुढच्या मेअखेर पूर्ण करणार; गारगोटी येथे मेळावा

The president of the Bidri factory will be the BJP | बिद्री कारखान्याचा अध्यक्ष भाजपचाच असेल

बिद्री कारखान्याचा अध्यक्ष भाजपचाच असेल

googlenewsNext

गारगोटी : भुदरगड-राधानगरी-आजरा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप चिन्हावरचा आमदार असेल, तर बिद्रीचा अध्यक्ष हा भाजप म्हणेल तो असेल. जिल्ह्याच्या विकासासाठी पाचशे कोटींचा निधी आणला असून, भुदरगड तालुक्यातील ३५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या शिवडाव-सोनवडे घाटाचे काम पुढच्या मेअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही देत, निवडणुकीसाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकार विधासभा व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेणार असल्याने मे २0१९ ला निवडणुका जाहीर होतील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
गारगोटी येथील इंजुबाई सभागृहात (सोनाळी) भुदरगड तालुका भाजप पार्टीच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळावा व सत्कार समारंभाच्या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थित जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत होते.
पाटील म्हणाले, भुदरगड तालुक्यातील विकासाची सुरुवात कधीच झाली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मुदाळ तिठ्ठा ते आदमापूर दरम्यानचा उड्डाणपूल, कोल्हापूर-गारगोटी चार पदरी रस्ता, शिवडाव-सोनवडे घाट, पाल घाटातील प्रशस्त रस्ता ही बरीच कामे आहेत. भाजपच्या वाढीने विचार केला, तर आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता निवडून जाणे गरजेचे आहे.
‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, भुदरगड तालुक्यात भाजपच्या पक्षांचा चढता आलेख पाहून आजदेखील तालुक्यातील अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.
बिद्रीचे प्रशासकीय संचालक नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. बिद्रीचे प्रशासकीय संचालक रणजितसिंह पाटील, अलकेश कांदळकर, प्रवीण सावंत, देवराज बारदेसकर, प्रा. हिंदुराव पाटील, योगेश परुळेकर, संतोष पाटील, नामदेव चौगले, नूतन पं. स. सदस्या आक्काताई नलवडे, रामचंद्र सणगर, रणजित आडके, दिलीप केणे, सुनील पाटील, जयवंत चोरगे, एन. के. देसाई, भगवान शिंदे, सुशांत मगदूम, संतोष डेळेकर, पी. बी. खुटाळे, संजय भोसले, सुनील तेली, सुरेश सुतार, ए. डी. कांबळे, आनंदा रेडेकर, गणपतराव शेटके, लखन लोहार, शहराध्यक्ष राहुल चौगले, उपस्थित उपस्थित होते. विनायक परुळेकर यांनी आभार मानले.

Web Title: The president of the Bidri factory will be the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.