पुढचे आरोप रोखण्यासाठीच ‘अब्रूनुकसान’चे हत्यार

By Admin | Published: April 27, 2016 12:23 AM2016-04-27T00:23:02+5:302016-04-27T00:58:49+5:30

शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प : हसन मुश्रीफ यांनीच घाटगे, पाटील, क्षीरसागर, आदींच्या विरोधात ठोकले आहेत दावे

To prevent further charges, 'Abrukasan' | पुढचे आरोप रोखण्यासाठीच ‘अब्रूनुकसान’चे हत्यार

पुढचे आरोप रोखण्यासाठीच ‘अब्रूनुकसान’चे हत्यार

googlenewsNext

विश्वास पाटील -- कोल्हापूर --एखाद्या राजकीय नेत्याने आरोप केल्यावर त्यातून अब्रूचे नुकसान कसे झाले हे सिद्ध करणे फारच क्लिष्ट असल्याने अब्रूनुकसानीच्या दाव्यात आतापर्यंत फारच कमी लोकांना शिक्षा किंवा दंड झाला आहे. मुळात या दाव्याची प्रक्रियाही दीर्घ आहे. ज्याने आरोप केले त्यास मानसिक त्रास देणे व पुन्हा असे आरोप कुणी करू नयेत यासाठीची दक्षता म्हणून मुख्यत: राजकीय नेत्यांकडून असे दावे दाखल केले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे असे दावे दाखल करण्यात सगळ््यात पुढे आहेत; परंतु गंमत अशी की तरीही त्यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप काही केल्या थांबलेले नाहीत.
चार दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक व सावतवाडी या कोरडवाहू गावांना माजी आमदार संजय घाटगे यांच्या प्रयत्नांतून अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्यात आले. त्या समारंभात शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुश्रीफ यांच्यावर त्यांनी जिल्हा बँकेचे कर्जमाफीतील दीड हजार कोटी रुपये लाटल्याचा आरोप केला. त्यांच्याविरुद्ध मुश्रीफ यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हा विषय नव्याने चर्चेत आला आहे. मुश्रीफ यांनी आतापर्यंत कितीजणांविरुद्ध असे दावे दाखल केले व त्याची प्रक्रिया असते तरी कशी, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

अशी असते प्रक्रिया
भारतीय दंडसंहिता कलम ४९९ आणि ५०० अन्वये हा दावा दाखल करता येतो. त्याचे दोन प्रकार आहेत. तो फौजदारी व दिवाणी अशा स्वरुपात दाखल करता येतो. माझ्या अब्रूचे किंवा प्रतिष्ठेचे नुकसान केल्याबद्दल आरोपीस शिक्षा व्हावी, असे वाटत असेल तर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो व जर त्यापोटी नुकसानभरपाई हवी असेल तर तो दिवाणी न्यायालयात दाखल करता येतो. जेवढ्या रकमेच्या दाव्यास न्यायालयाने संमती दिली असेल त्याच्या पाच टक्के रक्कम स्टॅम्प ड्युटीच्या स्वरुपात याचिकाकर्त्यास भरावे लागतात. आरोप सिद्ध झाल्यास संबंधितास दोन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. हा मूळ ब्रिटिशकालीन
कायदा आहे.
महत्त्वाची तरतूद...
या दाव्यात ज्याने दावा दाखल केला आहे, त्यालाच आपल्या प्रतिष्ठेचे कसे हनन झाले हे सिद्ध करून (ओनर्स टू प्रूव्ह) दाखवावे लागते. त्यासाठी अगोदर मी किती प्रतिष्ठित, नामी आहे हे सिद्ध करावे लागते. ही गोष्ट मोजता येत नाही. एकदा प्रतिष्ठा आहे हे सिद्ध केल्यावर मग अप्रतिष्ठा कशी झाली हे पटवून द्यावे लागते. न्यायालयाची सकृतदर्शनी खात्री झाल्यानंतरच प्रतिवादीस नोटिसा काढून म्हणणे मांडण्यास सांगितले जाते.


काही गाजलेले दावे...
नागपूरच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आरोप केल्यावर तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यावर बदनामीचा दावा ठोकला परंतु न्यायालयाने श्रीमती गांधी जिवंत असताना तुम्हाला त्यांच्यावतीने दावा दाखल करता येणार नसल्याचे सांगून फेटाळला. मदर तेरेसा यांच्याबाबतीतही असेच घडले होते.


नितीन गडकरी-केजरीवाल वाद
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आरोप केल्यावर गडकरी यांनी त्यांच्यावर असाच दावा ठोकला. परंतु पुढे केजरीवाल यांनी त्यासंबंधी माफी मागितल्यावर हा दावा मागे घेण्यात आला.


व्यक्तीआरोपाचे स्वरुप
आमदार राजेश क्षीरसागरकागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मुश्रीफ यांच्याकडून लूटमार
माजी आमदार संजय घाटगेजिल्हा बँक कागल शाखेतील गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर आरोप
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांचे ५४ लाख मुश्रीफ यांनीच लाटले.
नागनवाडी प्रकल्पात फेरनिविदा काढून मुश्रीफ यांनी पैसे खाल्ले
राजेंद्र गड्डाण्ण्यावरगडहिंग्लज कारखाना मुश्रीफ यांनीच गिळंकृत केला. ब्रीस्क ही कंपनी मुश्रीफ यांचीच
राज्यपत्रित कर्मचारी वृत्तवाहिनीवरील चर्चेत वाळू माफियांना
महासंघाचे नेते ग. दि. कुलथे कामगारमंत्री मुश्रीफ पाठीशी घालत असल्याचा केला होता आरोप
माजी महापौर सुनील कदममहापालिकेच्या मालकीची रमणमळा परिसरातील जागा मुश्रीफ यांनी लाटली.
सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलगडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत निलजीत झालेल्या मेळाव्यात मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप
परिवहनमंत्री दिवाकर रावतेजिल्हा बँकेच्या कर्जमाफीमध्ये मुश्रीफ यांनी १५०० कोटी रुपये लाटले

Web Title: To prevent further charges, 'Abrukasan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.