शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

सोयाबीनचा दर १० हजार, शेतकऱ्यांच्या हातात ६ ते ८ हजारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:28 AM

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे सोयाबीनच्या ...

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे सोयाबीनच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कधी नव्हे इतक्या १० हजार रुपये क्विंटल अशा सोयाबीन दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहेे. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडण्याची चिन्हे असतानाच व्यापाऱ्यांकडून आर्द्रता, काडीकचरा, गुणवत्ता, असे निकष लावून शेतकऱ्यांच्या हातात क्विंटलला सहा ते आठ हजार रुपयेच टेकवले जात आहेत.

गेल्यावर्षी खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर चढू लागले आहेत. अडीच हजारांवर असणारा दर एकदम दीड हजाराने वाढून तो ३९०० ते ४३०० इतका झाला. हंगाम पुढे सरकेल, तसे दर वाढतच गेले. उन्हाळी हंगामात ७ ते ८ हजार रुपये उच्चांकी भाव मिळाला. साहजिकच खरिपात सोयाबीनच्या पेरणीकडे कल वाढला. पीकक्षेत्र वाढल्याने दरात कमी येईल, असा कयास बांधला जात होता. तथापि, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. नदीकाठचे तर सोयाबीन कुजून गेले. माळरानावरचे सोयाबीन तरले; पण पाऊस ओसरल्यानंतर तांबेरा, करपा, पाने खाणाऱ्या अळीसह तुडतुडे, माव्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्याने सोयाबीन पिकावर औषध फवारण्या वाढवाव्या लागल्या. लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून गेल्या दीड - दोन वर्षांत कीटकनाशकांच्या किमती दुपटी-तिपटीने वाढल्या आहेत. एका गुंठ्याचा फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये झाला. शिवाय आंतरमशागतीसह कापणी, मळणीचा खर्चही गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी हा खर्चही पेलला; पण प्रत्यक्षात विक्री सुरू झाल्यावर व्यापाऱ्यांकडून लूट सुरू झाली आहे. हवा जास्त आहे, काडीकचरा आहे, असे सांगत दरात कपात केली जात आहे, तसेच काटामारीही वाढली आहे. दर दहा हजार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सहा ते आठ हजारच हातावर टेकवले जात आहेत. उघडपणे सुरू असलेल्या या लुटीची तक्रार करायची तरी कोणाकडे? या संभ्रमावस्थेत उत्पादक आहेत.

सोयाबीनचे वाढत गेलेले दर (क्विंटलमध्ये)

वर्ष दर

सप्टेंबर २०१८ १९००

सप्टेंबर २०१९ २५००

सप्टेंबर २०२० ३९००

एप्रिल २०२१ ७०००

सप्टेंबर २०२१ १००००

चौकट

अशी होते लूट (एका पोत्यामागे)

बारदान: २ किलो

काडीकचरा: ३ किलो

हवा : २ ते ३ किलो

चौकट

जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र : ४० हजार ४७८ हेक्टर

सरासरी उत्पादकता : एकरी सरासरी १५ ते २० क्विंटल

मिळणारा दर : ६ ते ८ हजार

एकरी उत्पादन खर्च : २५ ते ३० हजार

चाैकट

मार्केटिंग फेडरेशन सूचनेच्या प्रतीक्षेत

किमान आधारभूत किमतीच्या वर सोयाबीनचे दर गेल्याने यावर्षी मार्केटिंग फेडरेशनचे काही काम उरलेले नाही. तसे दरवर्षीही त्यांना नसतेच. किमान हमीभावापेक्षाही कमी दराने गेल्यावर्षीच्या खरिपात सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांकडून होत होती, तरीदेखील फेडरेशनने केंद्र सुरू करायची तसदी घेतली नाही, की कारवाई केली नाही. यावर्षी तर दर वाढल्याने फेडरेशनचा विषयच संपला आहे. तरीदेखील कार्यालयाकडे विचारणा केल्यावर, सरकारच्या सूचना आल्यावर पाहू, असे उत्तर देण्यात आले.

चौकट

वर्षातून दोन वेळा उत्पादन

साेयाबीनचे उत्पादन खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात येईल, असे वाण विकसित केले आहेत. जीएस ३३५ व ९३०५ हे वाण ९० ते १२० दिवसात येत असल्याने आणि टपोऱ्या दाण्यासह उताराही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी कायम आहे. चांगला दर मिळत असल्याने वर्षातून दोनवेळा लागवड करण्याकडे कल वाढला आहे.