प्रिया पाटील ही सध्या कोल्हापूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वाहून नेणाऱ्या शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत आहे. गेल्या दीड महिन्यापासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने ती कार्यरत आहे. कोरोनाबधितांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यापर्यंत आणि कोरोनाग्रस्तांच्या निधनानंतर मृतदेहाला शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन प्रसंगी अंत्यसंस्कार करण्याचे कामही करत आहे. आतापर्यंत सुमारे २४० मृतदेह वाहून नेऊन त्यांच्यावर तिने अंत्यसंस्कार केले आहेत. या कार्याबद्दल विद्यापीठात बुधवारी सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते तिचा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यावेळी एनएसएसचे संचालक अभय जायभाये, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. बी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पाटील, अधीक्षक चंद्रशेखर दोडमणी उपस्थित होते.
फोटो (०७०७२०२१-कोल-प्रिया पाटील सत्कार) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या प्रिया पाटील हिचा ग्रंथ भेट देऊन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी अभय जायभाये, आर.आर. कुंभार, एच.बी. पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर दोडमणी उपस्थित होते.
‘एमसीए’च्या प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत अर्ज करा
कोल्हापूर : कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २३ जुलैपर्यंत आहे. एमसीए प्रवेशासाठी ही परीक्षा देणे आवश्यक आहे. गणित या विषयासह बारावी किंवा पदवी घेतलेल्या किंवा पदवी परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी हे एमसीए अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी (www.mahacet.org) या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन केआयटीज, आयएमईआरचे संचालक डॉ. सुजय खाडिलकर आणि एमसीए विभागप्रमुख प्रा. सुनील पाटील यांनी केले आहे.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरकडून अहवालाचे लोकार्पण
कोल्हापूर : येथील रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरच्या चौथ्या अहवालाचे लोकार्पण मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण अधिकारी ओंकार नवलेहालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तरुणांनी उच्चशिक्षण घेऊन देशसेवा, जनसेवा करण्याचा सल्ला या प्रमुख उपस्थितांनी दिला. यावेळी रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संचालक श्रेयस पाटील, प्रत्युष दोशी, शुभम जाधव आदी उपस्थित होते.
फोटो (०७०७२०२१-कोल-रोट्रॅक्ट क्लब) : मुंबई येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरच्या चौथ्या अहवालाचे लोकार्पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण अधिकारी ओंकार नवलेहालकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.