पारदर्शक कारभारामुळे संस्थेची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:44 AM2021-02-21T04:44:19+5:302021-02-21T04:44:19+5:30
जाहिरात संस्था आहे सविस्तर फोटोसह घ्यावी पेठवडगाव : गतवर्षात संस्थेत १० कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. त्यामुळेच ...
जाहिरात संस्था आहे सविस्तर फोटोसह घ्यावी
पेठवडगाव : गतवर्षात संस्थेत १० कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. त्यामुळेच संस्थेने १२९ कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. येत्या काळात ठेवींचा टप्पा १५० कोटींच्या पुढे जाईल. संस्थेने पारदर्शक कारभार, प्रामाणिक, सचोटीने व्यवसाय केला आहे. यापुढे छोट्या कर्जदारांना कर्ज देऊन मदतीचा हाथ द्या, असे आवाहन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.
येथील जय भवानी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची ४४ वी वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास सणगर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विद्या पोळ, उपाध्यक्ष शेलार सूर्यवंशी, सुनील हुकेरी, माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
विद्या पोळ म्हणाल्या, ‘संस्थेने वडगाव परिसरातील सर्वसामान्य लोकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना आर्थिक मदत केली आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहेत. विलास सणगर यांनी अहवाल वाचन, तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पोळ यांनी विषय वाचन केले, तर आभार शरद पाटील यांनी मानले. यावेळी पुरस्कार प्राप्त, गुणवंत, कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात झाला. रणजितसिंह यादव, विजय शहा, डॉ. बाळासाहेब होसकल्ले, विशाल वडगावे, सुभाष पाटील, राजू देवस्थळी, सुवर्णा यादव आदींसह सभासद उपस्थित होते.
फोटो ओळ: पेठवडगाव : येथील जयभवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सभेस माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी संबोधित केले. यावेळी विद्या पोळ, डॉ. अशोक चौगुले, विजय शहा, विलास सणगर, डॉ. बाळासाहेब होसकल्ले, सुनील हुकेरी आदी उपस्थित होते. (छाया : संतोष माळवदे)