लसीकरणाचे योग्य नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:00+5:302021-04-25T04:24:00+5:30
कोल्हापूर : लसीकरण केंद्रांवरील गर्दी पाहिल्यानंतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा लसीकरण प्रक्रियेला योग्य नियोजनाच्या ...
कोल्हापूर : लसीकरण केंद्रांवरील गर्दी पाहिल्यानंतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा लसीकरण प्रक्रियेला योग्य नियोजनाच्या माध्यमातून शिस्त लावावी अशी मागणी श्री उत्तरेश्वर शुक्रवार पेठ युवा संघटना यांच्यावतीने महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरामध्ये लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. लसीसाठी झुंबड उडत आहे. यामुळे कोरोनाचाच प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गरज पडल्यास युवा संघटनचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणूनही काम करण्यास तयार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माेहसीन मणेर, विराज चिखलीकर, स्वप्निल साठे, सम्राट शिर्के, इंद्रजित नलवडे, असीम म्हालदार, स्वप्निल जाधव उपस्थित होते.
२४०४२०२१ कोल व्हॅक्सिनेशन निवेदन
लसीकरण करताना नियोजन करावे अशी मागणी श्री उत्तरेश्वर शुक्रवार पेठ युवा संघटना यांच्यावतीने महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.