गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या वीज उद्योग खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ येथील महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, राज्य वीज कामगार काँग्रेस या संघटनातर्फे ही निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या द्वार सभेत केंद्राच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सागर दांगट म्हणाले, शासकीय कार्यालये खासगी कंपन्यांना चालवायला देण्याचा सरकारचा घाट आहे. केंद्राच्या खासगीकरणाचे धोरण ग्राहक व कर्मचारी दोघांनाही मारक आहे, हे अन्यायी धोरण सरकारने मागे घ्यावे.
वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव सादीक देसाई, नागेश बसरीकट्टी, संदीप पाटील, श्रीपाद चिकुर्डे, दत्तात्रय गुरव, आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे महावितरण विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सादीक देसाई, नागेश बसरीकट्टी, संदीप पाटील, श्रीपाद चिकुर्डे, दत्तात्रय गुरव, पाटील, आदी सहभागी झाले होते.
क्रमांक : १९०७२०२१-गड-०६