कोल्हापूर पंचायत राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने पंचायत समिती गडहिंग्लज आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला
या ऑनलाईन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर,गडहिंग्लजच्या सभापती रुपाली गौतम कांबळे,उपसभापती ईराप्पा हासुरे, पंचायत समिती सदस्या श्रीया कोणकेरी, अधीक्षक अमित माळगे, तमनाकवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका दयानंद साळवी, ग्रामसेवक वासंती अशोक मगर उपस्थित होत्या.
२४०४२०२१ कोल झेडपी ०१/२
पंचायत राज दिनानिमित्त कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.