वडगावात जमावबंदीमुळे अश्वारूढ पुतळा लोकार्पण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:58+5:302021-09-21T04:25:58+5:30
जिल्हा प्रशासनाने राजकीय पार्श्वभूमीवर अचानक जमाव बंदी करीत कलम १४४ लागू केले. पोलीस प्रशासनाने कार्यक्रम रद्द केल्याची नोटीस मुख्याधिकारी ...
जिल्हा प्रशासनाने राजकीय पार्श्वभूमीवर अचानक जमाव बंदी करीत कलम १४४ लागू केले. पोलीस प्रशासनाने कार्यक्रम रद्द केल्याची नोटीस मुख्याधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींना लागू केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांनी पालिकेस शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण कार्यक्रम शुक्रवारी घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, अश्वारूढ पुतळा सुशोभीकरण कामे गतीने सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्यानंतर कार्यक्रम तात्पुरता स्थगित झाल्यावर अश्वारूढ पुतळा झाकण्यात आला. चौकात शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
दरम्यान, पितृपंधरवडा सुरू होणार असल्यामुळे नवीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिवजन्मोत्सव कमिटीचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या पत्नी श्रद्धा पाटील यांनी पूजन करून अभिवादन केले. पालिकेच्यावतीने लोकार्पण शुक्रवारी सायंकाळी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटनेत्या श्रीमती प्रवीता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पत्रकातून दिली आहे.
फोटो कॅप्शन : पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उद्घाटन स्थगित झाल्यानंतर झाकण्यासाठी अशी लगबग सुरू होती.