प्रा. भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले : भाऊसाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 02:13 PM2021-07-20T14:13:12+5:302021-07-20T14:16:01+5:30
Gadhingalaj Kolhapur : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील-महाराज यांनी काढले.
गडहिंग्लज : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील-महाराज यांनी काढले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख व नामवंत वक्ते प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते.
प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले, व्यासंगी शिक्षक, वक्ते, लेखक, अभ्यासक, प्रवचनकार व कीर्तनकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या भुकेले यांच्यामुळे घाळी महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, प्रा.यशवंत कोले,प्रा. अनिल उंदरे, प्रा.अरविंद कुलकर्णी, प्रा.अनिल मगर, प्रा.आशपाक मकानदार, प्रा.पी. डी. पाटील, रवींद्र खैरे, डॉ. स्वाती कमल यांची भाषणे झाली. प्रा. भुकेले व स्नेहा भुकेले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी सभापती प्रा.जयश्री तेली,माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम, अरविंद कित्तूरकर, अॅड. अर्जून रेडेकर, वसंत यमगेकर, प्रकाश तेलवेकर, नागेश चौगुले, किरण डोमणे, शैलेंद्र कावणेकर, डॉ. किरण खोराटे, प्रतापराव सरदेसाई, सूरज आसवले, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते. प्रा. डॉ.
सरला आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.महेश कदम यांनी सूत्रसंचलन केले. प्रा.डॉ.नागेश मासाळ यांनी आभार मानले.