Kolhapur- आषाढी एकादशीला राधानगरी मार्ग बंद, जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:44 PM2023-06-28T16:44:49+5:302023-06-28T16:45:27+5:30
पायी दिंडी-पालखीचा मार्ग कसा असणार..वाचा
कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी (दि. २९) कोल्हापुरातून नंदवाळ येथे पायी दिंडी जाते. दिंडीमार्गात वाहतुकीचा अडथळा येऊ नये, यासाठी राधानगरी मार्गावरील वाहतूक तात्पुरती इस्पुर्लीमार्गे वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण पोलिसांनी दिली.
पायी दिंडी-पालखीचा मार्ग
विठ्ठल मंदिर-मंगळवार पेठ-उभा मारुती चौक-राजकपूर पुतळा-क्रशर चौक-नवीन वाशी नाका-पुईखडी-वाशी गाव-नंदवाळ
वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग
वाशी पेट्रोलपंप (हजारे पंप) ते खत कारखाना ओढ्यापर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. (शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून). कोल्हापूरकडूनराधानगरीमार्गे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस व अवजड वाहने कळंबा इस्पुर्ली - शेळेवाडी- परिते फाटा भोगावतीमार्गे वळविण्यात आली आहेत. कोल्हापूर आणि रंकाळा एसटी स्टॅण्ड ते राधानगरी जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस वाशी-हळदी-परितेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. राधानगरीकडून कोल्हापूरकडे येणारी हलकी चारचाकी वाहने (कार व जीप) हळदी- इस्पुर्लीमार्गे पुढे वळविण्यात आली आहेत.
वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग
नंदवाळ फाटा ते नंदवाळ गावाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असेल. जैताळ फाटा ते नंदवाळ मार्ग सर्व वाहनांसाठी बंद केला आहे. भीमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळ गावाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद केला आहे.
पार्किंग ठिकाणे
खत कारखाना, गिरगाव फाटा, चोरगे महाविद्यालय परिसर