कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:01 AM2018-03-11T04:01:22+5:302018-03-11T04:01:22+5:30

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील रो हाऊससह महेश फळणीकरच्या आजरा येथील घरावर मुंबई पोलिसांनी शनिवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले.

 Raids on Kurundkar, Purnaikar's house | कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरांवर छापे

कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरांवर छापे

Next

कोल्हापूर/आजरा - महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील रो हाऊससह महेश फळणीकरच्या आजरा येथील घरावर मुंबई पोलिसांनी शनिवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले.चार तास घरझडती सुरू होती. कुरुंदकरच्या बंगल्यावरील महिला सफाई कामगारासह फळणीकरचे वडील, भाऊ, पत्नी यांचे जबाब घेतले. दोन्ही ठिकाणांहून काही साहित्य जप्त केले असून, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते.
गेल्या २ वर्षांपासून कुरुंदकरच्या संपर्कात असणाºया कोल्हापूर पोलीस दलातील दोघा पोलिसांची मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांनी कसून चौकशी केली.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरुंदकर (भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरुंदकरचा कारचालक कुंदन भंडारी (रा. भंडारी हाऊस, बंदरपाडा, कांदिवली, मुंबई), महेश फळणीकर (रा. आजरा जि.कोल्हापूर) या चौघांना अटक केली आहे. फळणीकरने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली आहे. बिद्रे यांच्या खुनाचा कट कुरुंदकरने आजºयातील हाळोली येथील फार्म हाउसवर रचल्याचा संशय आहे. शरीराचे तुकडे केलेल्या इलेक्ट्रिक कटरची विल्हेवाट आजरा-कोल्हापूर परिसरात लावली आहे.
तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी दोन पथके स्थापन करून एकाच वेळी छापे टाकले. कोल्हापुरातील बंगला कुरुंदकरची पत्नी आरतीच्या नावे असून, सहा महिन्यांतून एकदा कुरुंदकर कुटुंबांसह या ठिकाणी येत असतो.

कटरबद्दल माहिती नाही

अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूडकटरने तुकडे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो कटर कुठे आहे, याची माहिती महेश फळणीकर याला आहे. त्याला विश्वासात पथकाने विचारणा केली; परंतु त्याने कटरसंबंधी तोंड न उघडल्याने दिवसभर शोध लागला नाही.

Web Title:  Raids on Kurundkar, Purnaikar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.