राखी पौर्णिमेमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:59+5:302021-08-20T04:27:59+5:30
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर काही महिन्यांतच दुसरी लाट आली. त्यामुळे ...
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर काही महिन्यांतच दुसरी लाट आली. त्यामुळे कोल्हापूरच्या शाहू छत्रपती टर्मिनन्समधून सुटणाऱ्या बहुतांशी रेल्वे सेवेवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा मुंबई, दिल्ली, नागपूर आदी शहरांमध्ये रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे काही मार्गावर प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, तर काही मार्गावर अल्पसा प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे राखी पौर्णिमेनिमित्त मुंबई, नागपूर, अहमदाबाद आदी शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ वाढू लागला आहे. आरक्षणही फुल्ल होऊ लागले आहे. कोल्हापूरच्या शाहू छत्रपती रेल्वे टर्मिनन्समधून कोल्हापूर ते मुंबई , कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर ते धनबाद, कोल्हापूर ते नागपूर, कोल्हापूर ते अहमदाबाद, कोल्हापूर ते दिल्ली अशी रेल्वे सेवा विशेष रेल्वे म्हणून सुरू झाली आहे. या गाड्यांना वेटिंग जादा आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वेला वेटिंग
कोल्हापूर -तिरुपती (हरिप्रिया), कोल्हापूर -मुंबई (महालक्ष्मी), कोल्हापूर -धनबाद, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर -दिल्ली (निजामुद्दीन)
रेल्वे मार्ग स्लीपर कोच एसी (टू टायर) एसी (थ्री टायर)
कोल्हापूर-तिरुपती ५५ ४५ ५०
कोल्हापूर - नागपूर २० २५ ४०
कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी) ९० ३० ७५
कोल्हापूर - अहमदाबाद १०७ ७८ ३६
कोल्हापूर - दिल्ली ०५ - -
कोल्हापूर- धनबाद २३ - -
या रेल्वेला प्रवासी अधिक
कोल्हापूर ते अहमदाबाद, कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. विशेषत: अहमदाबाद मार्गावर व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहे. त्यामुळे रेल्वेस मोठी प्रतीक्षा यादी आहे. त्यापाठोपाठ कोल्हापुरातून व्यापारी वर्ग व्यवसायानिमित्त मुंबईत ये-जा करीत आहेत. त्यामुळे मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंती आहे. या मार्गावर सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासीवर्गांकडून होत आहे.