गौरव सांगावकर राधानगरी : दडी मारलेल्या मान्सूनने अखेर हजेरी लावली आहे. जिल्ह्यात राधानगरीसह ठिकठिकाणी आज, शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. राधानगरी धरण परिसर, फेजीवडे व दाजीपूर परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाल्याने बळीराजा सुखावला. पावसामुळे भात तरव्याना पाणी मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नांगरणीला तसेच भात लावणीला वेग येणार आहे. शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती.गेले महिनाभर पावसाने दडी मारल्याने पसरलेले चिंतेचे ढग दूर झाले आणि शेतकऱ्यांनसह सर्वांची काळजी मिटली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली होती. परिणामी धरण साठ्यातील पाणीसाठ्यात घट झाली. नद्या, नाले कोरडे पडल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. पावसाकडे बळीराजाचे डोळे लागून राहिले होते. अखेर वरुणराजाने हजेरी लावल्याने नागरिकांसह, शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.ट्रक झाडावर आदळला, वाहतूक विस्कळीतपडळी-राऊतवाडी रोडवर ट्रक झाडावर आदळल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या वाहनासाठी बेनजर व्हिला, राऊतवाडी धबधब्याकडे जाण्यास मार्ग बंद झाला आहे,
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात; राधानगरीसह दाजीपूर परिसरात मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 2:05 PM