राजाराम साखर कारखान्यात राजाराम महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:22 AM2021-08-01T04:22:09+5:302021-08-01T04:22:09+5:30
येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती राजाराम ...
येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बेनाडी, माजी आमदार अमल महाडिक, मानद तज्ज्ञ सल्लागार पी.जी. मेढे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, ‘‘राजाराम महाराज यांच्यामुळेच राजाराम साखर कारखान्याची निर्मिती झाली. कोल्हापूरचे रस्ते, आरोग्य, विमानसेवा इत्यादी सुविधा उभारण्यासाठी महाराजांच्या दूरदृष्टीने केलेल्या उपाययोजना तसेच राजश्री शाहूंचे अपुरे राहिलेले राधानगरी धरणाचे काम राजाराम महाराजांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले.
फोटो : ३१ राजाराम महाराज जयंती साखर कारखाना
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी आमदार अमल महाडिक, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, हरीष चौगले उपस्थित होते.