जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराचा शताब्दी प्रारंभ दिवस हा ऐतिहासिक असून, या शहराने राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची परंपरा कायम जोपासली आहे. शहराची औद्योगिक व विकासात्मक दृष्टी पाहता ज्या दूरदृष्टीने शाहू महाराजांनी हे शहर वसविले ते शाहू महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले. या शहराचा मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केले. येथील पालिकेच्या खुल्या नाट्यगृहात जयसिंगपूर शहराच्या शताब्दी वर्षारंभ समारंभात अध्यक्षस्थानावरून श्रीमंत शाहू महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमित सैनी, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून समारंभास प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू महाराज पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी चळवळीचा आहे. जयसिंगपूर शहरातील वाढती लोकसंख्या व अन्य परिसरातील गावांचा विचार करता हद्दवाढ करताना शहरवासीयांनी नेमका निर्णय घ्यावा. एकजुटीने व एकदिलाने एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करणाऱ्या जयसिंगपूरवासीयांचे कौतुक वाटते, असे सांगून त्यांनी शताब्दी वर्षपूर्ती प्रसंगी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊन कार्यक्रमही आयोजित करण्याबाबत पुढाकार घेऊ, असे सांगितले. खासदार राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर शहराला मोठा इतिहास आहे. शताब्दीच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत. अशाच पद्धतीने शताब्दी महोत्सवाचा समारोपही व्हावा. शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणाचा आदर्श घेऊन जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती झाली. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना हे वरदान ठरले आहे. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी स्वागत नगराध्यक्ष रेखा राजीव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक भाषणात पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी, गेल्या पंधरा वर्षांतील विकासात्मक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार किरण काकडे, मुख्याधिकारी हेमंत निकम, सुरेशदादा पाटील, सावकर मादनाईक, अशोकराव कोळेकर, अमरसिंह निकम, अॅड. संभाजीराजे नाईक, सतीश मलमे, सुरज भोसले, मिलिंद भिडे, विठ्ठल पाटील, शंकर बिराजदार, शैलेश आडके, रमेश शिंदे, श्रीपती सावंत, सुनील शेळके, अमरदीप कांबळे, भगवंत जांभळे, पराग पाटील, मिलिंद शिंदे, सुभाष भोजणे, डॉ. अतिक पटेल, प्रकाश झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, नंदू बलदवा, धनाजीराव देसाई, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, राजेंद्र नांद्रेकर, राजू झेले, डॉ. महावीर अक्कोळे, स्वरुपा पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष स्वाती पडूळकर, अनुराधा आडके, स्नेहा शिंदे, राजश्री जाधव, अलका खाडे, राणी धनवडे, आदी उपस्थित होते. प्राजक्ता पाटील आणि बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. अन् हशा पिकला या समारंभात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अचानक माईकचा ताबा घेऊन सातवा वेतन कधी मिळणार याचे मान्यवरांनी उत्तर द्यावे, असे विचारले. त्यावर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मीसुद्धा सातव्या वेतनाची वाट पाहत आहे, असे म्हणताच उपस्थितात हशा पिकला. झोपडपट्टीप्रश्नी लक्ष घालू शहराच्या हद्दवाढीबाबत पालिकेने दिलेल्या प्रस्तावावार ताबडतोब विचार करून निर्णय घेतला जाईल. तसेच या शिरोळ तालुक्यात जे काही कार्यक्रम होतात ते वर्षभर चालणारे असतात, राज्यात हा एकमेव तालुका असेल असे सांगून जिल्हाधिकारी सैनी यांनी झोपडपट्टी नियमित करण्याबाबत आपण पालिका प्रशासनास सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहूंचे विचार जयसिंगपूरकरांनी जोपासले
By admin | Published: September 22, 2016 12:44 AM