‘गोकुळ’मध्ये रणजित पाटील यांच्या उमेदवारीस मंडलिक गटाचा विरोध
By admin | Published: April 1, 2015 12:30 AM2015-04-01T00:30:50+5:302015-04-01T00:31:06+5:30
शनिवारी गटाचा निर्णय : महाडिक यांनी घेतली पी. एन. यांची भेट
कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकारणात दिवंगत नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाची स्वतंत्र ताकद आहे, ती ताकद जिल्ह्यांतही आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत मंडलिक गटाला कोणत्याही एका जागेवर प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंगळवारी सत्तारुढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे केली. आम्हाला उमेदवारी नसेल तर विद्यमान संचालक रणजित पाटील यांनाही उमेदवारी दिली जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कागल तालुक्यातील राजकारणाला चांगलाच रंग आला आहे. आमदार हसन मुश्रीफ गटाकडून संजय घाटगे यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून मंडलिक गटाने रणजित पाटील यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला. मंडलिक गटाला सोबत घेण्यासाठी त्यांचे जावई राजेश नरसिंगराव पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार सत्तारुढ गटाने केला आहे. त्यामुळे मंडलिक गट व चंदगड तालुक्यात नरसिंगराव पाटील गटाची ताकद मिळू शकते. ‘एका दगडात दोन पक्षी’ मारण्याचा हा सत्तारुढ गटाचा डाव आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, नामदेव मेंडके, बाबासाहेब पाटील, राजेखान जमादार, चंद्रकांत गवळी, अतुल जोशी, सुहास खराडे, सत्यजित पाटील आदींनी राजाराम कारखानास्थळावर जाऊन दुपारी साडेचारच्या सुमारास आमदार महाडिक यांची भेट घेतली व त्यानंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत माजी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेऊन गटाची भूमिका स्पष्ट केली.
मंडलिक गटाची तालुक्यासह जिल्'ांतही ताकद आहे. तालुक्यात मंडलिक व घाटगे गटाची स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे संजय घाटगे गटाला उमेदवारी द्याच परंतु त्याचवेळी मंडलिक गटालाही सत्तेत स्वतंत्र वाटा
मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते भेटले. प्रत्येकाला पॅनेलमध्ये संधी हवी अशी अपेक्षा असते. चर्चेतून आम्ही योग्य मार्ग काढू
-महादेवराव महाडिक, सत्तारुढ गटाचे नेते
मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते मंगळवारी भेटले. त्यांनी आम्ही सत्तारुढ गटाबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची संजय घाटगे यांच्याशिवाय मंडलिक गटासाठी अन्य एका जागेची मागणी आहे. आम्हाला उमेदवारी देणार नसाल तर रणजित पाटील यांनाही ती देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली.
-पी. एन. पाटील, सत्तारुढ गटाचे नेते.
आमच्या गटाचे प्रमुख नेते मंगळवारी ‘गोकुळ’च्या सत्तारुढ आघाडीच्या दोन्ही नेत्यांना भेटले. मंडलिक गटाला स्वतंत्र सत्तेत सहभाग हवा, अशी आमची मागणी आहे. त्यासंदर्भात काय करणार, हे आम्हाला शनिवारपर्यंत (दि.४ एप्रिल) कळवावे, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आम्ही गटाचा निर्णय घेऊ
- संजय मंडलिक, गटनेते दिवंगत मंडलिक गट
पॅनेल निश्चितीत अडचण येणार नाही : महाडिक
गोकुळच्या निवडणुकीतील माघारीस आठवड्याची मुदत राहिल्याने पॅनेल रचनेबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी आमदार महाडिक व पी. एन. पाटील हे भेटणार होते परंतु ती भेट झाली नाही. त्यासंबंधी महाडिक यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पी. एन. यांना मी रोजच भेटतो परंतु आज मुद्दाम त्यासंबंधी भेट झालेली नाही. आम्ही दोघे एकत्रितच आहोत. त्यामुळे पॅनेल निश्चित करताना कोणतीही अडचण येणार नाही. सगळ््यांशी चांगली चर्चा सुरू आहे. सगळ््यांचीच सहकार्याची भावना आहे. त्यामुळे अडचण येईल असे वाटत नाही.’