म्हाकवे : हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची नोंदणी बहुराज्य (मल्टीस्टेट) कायद्याखाली करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. तसेच हयातभर पुरोगामी विचारांची कास धरलेले जिल्ह्यातील लढवय्ये लोकनेते, दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा पुर्णाकृती पुतळा कोल्हापूर येथील कावळा नाका ते व्हिनस कॉर्नर या मुख्य मार्गावर उभारण्याचा निर्धारही सभासदांनी केला.हमिदवाडा येथील मंडलिक साखर कारखान्याची २१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक होते. यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले - म्हाकवेकर, माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रकांत गवळी, युवा नेते विरेंद्र मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कारखान्याने यंदा ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट्ये ठेवले आहे. कारखान्याच्या मद्यार्क (डिस्टलरी) प्रकल्पाचे येत्या आठ दिवसात भूमिपूजन करणार आहे. हा प्रकल्प आठ ते नऊ महिन्यात कार्यान्वीत करु. तर येत्या पाच वर्षामध्ये कारखान्याची गाळप क्षमता १० हजार मेट्रीक टनापर्यंत, सहवीज प्रकल्प १२ मेगॉवॅटवरुन ४४ मेगॉवॅटपर्यंत, डिस्टलरी (मद्यार्क) ३० के.एल.पी. डी.वरुन ९० के.एल.पी. डी. विस्तारीत करण्याचा मानस आहे. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी शेतकºयांनी सर्व ऊस कारखान्यास गळीतास पाठवणे गरजेचे आहे.
अहवाल वाचन कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संचालक प्रा. बापूसो भोसले-पाटील यांनी केले. यावेळी आर.डी. पाटील (कुरुकलीकर) यांनी ऊस उत्पादकांकडून कपात केलेली रक्कम कारखान्याकडून एस.डी. एम. फौंडेशनकडे वर्ग करण्याचा, सत्यजित पाटील (सोनाळी) यांनी केंद्र शासनाने साखर विक्रीवर लादलेले निर्बंध रद्द करण्याचा, आनंदा गुरव (चौंडाळ), एम. आर. चौगुले (पिंपळगाव खुर्द) यांनी ठराव मांडले.
कारखान्याने घेतलेल्या ऊस पिक स्पर्धेतील विजेते शामराव पाटील (कौलगे), सुरेश पाटील (मौजे सांगाव), विजय चौगुले (आणूर) यांच्यासह कारखाना बिनविरोध करण्यात यशस्वी झालेले प्रा. संजय मंडलिक, उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांचा सभासदांच्यावतीने सत्कार करण्यात आला.सभेस संचालक शिवाजीराव इंगळे, धनाजी बाचणकर, मारुती काळूगडे, आनंदा मोरे, आप्पासाहेब तांबेकर, शहाजी यादव, विश्वास कुºहाडे, मसू पाटील, दिनकर पाटील, राजश्री चौगुले (आणूर), नंदिनीदेवी घोरपडे (खडकेवाडा), सभापती कमल पाटील आदीसह सभासद शेतकरी उपस्थित होते. संचालक ईगल प्रभावळकर यांनी आभार मानले.नोव्हेंबरमध्ये पुरस्कार वितरण तर डिसेंबरमध्ये कुस्ती मैदान : प्रा. मंडलिकदिवगंत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या नावे त्यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रीडा व राजकिय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाºया व्यक्तिंना पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. तर डिसेंबर महिन्यात खासबाग मैदानात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन् ाकरण्यात येणार असल्याची घोषणा प्रा. मंडलिक यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.