महारक्तदान शिबिरात २०२५ जणांचे विक्रमी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:09+5:302021-03-25T04:23:09+5:30

जयसिंगपूर : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे नांदणी (ता. शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, श्री गणेश बेकरी, नांदणी प्रा. ...

Record blood donation of 2025 people in the blood donation camp | महारक्तदान शिबिरात २०२५ जणांचे विक्रमी रक्तदान

महारक्तदान शिबिरात २०२५ जणांचे विक्रमी रक्तदान

Next

जयसिंगपूर : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे नांदणी (ता. शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, श्री गणेश बेकरी, नांदणी प्रा. लि. चे अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त एकाचदिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात तब्बल २७ ठिकाणी महारक्तदान शिबिर पार पडले.

यामध्ये २०२५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. कोरोना काळातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसादाचा एक भाग म्हणून हे शिबिर यशस्वी झाले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

उद्योग क्षेत्रातील वाटचालीबरोबर सामाजिक ऋणानुबंध जपण्याची परंपरा चकोते ग्रुपचे कर्मचारी, वितरकांबरोबरच अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम राहिला. नवजीवन वाचनालय येथे आण्णासाहेब चकोते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कर्नाटक भागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, बीड, लातूर, बारामती, मिरज, इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, गडहिंग्लज, गारगोटी, मुरगूड, मरळी, तासगाव, विटा, जत, अकलूज, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, मांजरी, परळी, अंबेजोगाई, चाकूर, अहमदपूर, किनवट, औसा, बार्शी, मुरूड, उदगीर, नांदणी व हरोली याठिकाणी रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २५ रक्तपेढ्या व १७५ वैद्यकीय विभागाचे सहकार्य मिळाले. उद्योग समूहातील महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदविला.

उपक्रमाचे कौतुक

पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महारक्तदान शिबिर उपक्रमाचे कौतुक केले. उद्योगपती संजय घोडावत यांनी जयसिंगपूर येथील शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चकोते यांना शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

कोट - कोरोना काळातील रक्तटंचाईचे गांभीर्य ओळखून या सामाजिक उपक्रमात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन महारक्तदान शिबिर यशस्वी केले. विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी यापध्दतीने उपक्रम राबविल्यास देशात आलेल्या रक्तटंचाईवर मात करता येईल. त्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा.

- आण्णासाहेब चकोते, अध्यक्ष चकोते उद्योग समूह

फोटो - २४०३२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - चकोते ग्रुपचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर पार पडले. यावेळी चकोते यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

Web Title: Record blood donation of 2025 people in the blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.