कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:59 AM2019-11-06T11:59:00+5:302019-11-06T12:04:50+5:30

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ मिलिमीटर अधिक पाऊस झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.

Record-breaking rain in Kolhapur, Sangli | कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस

कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊसआॅक्टोबरच्या सरासरीपेक्षा ३०० टक्के पर्जन्य : खरिपाचे मोठे नुकसान

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूरसांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ मिलिमीटर अधिक पाऊस झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात  पावसाचा काहीसा लहरीपणा अनुभवास येतो. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत तालुकानिहाय पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. सातारा व सांगली जिल्ह्यांत दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते; तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड व सातारा जिल्ह्यांतील महाबळेश्वर तालुक्यात जोराचा पाऊस होतो.

साधारणत: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस परतीच्या मार्गावर लागतो; पण यंदा कोल्हापूर व सांगलीकरांनी निसर्गाचे वेगळे रूप अनुभवले. जुलै व आॅगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने झोडपून काढले. महापुराने येथून पाठीमागचे सर्व रेकॉर्ड मोडत नवीन विक्रम प्रस्थापित केले.

महापुराने शेतीचे कोट्यवधीचे नुकसान तर झालेच; पण अनेक कुटुंबे बेघर झाली. सप्टेंबर महिन्यात पाऊस पाठ सोडील असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. दसरा व दिवाळी सण पावसात वाहून गेल्यासारखीच परिस्थिती होती.

कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात ३११० मिलिमीटर म्हणजेच सरासरी २६० मिलिमीटर, तर सांगलीत २६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापुरात सरासरी ५० मिलिमीटर, तर सांगलीत या कालावधीत फारच तुरळक पाऊस होतो. यंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नसल्याने केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असे नाही, तर सर्वच घटक अडचणीत आले आहेत.

दुष्काळी पट्ट्यातही विक्रमी पाऊस

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व कडेगाव या दुष्काळी तालुक्यांत आॅक्टोबर महिन्यात अनुक्रमे सरासरी ३१० व १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आॅक्टोबर महिन्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा 
वर्ष               कोल्हापूर    सांगली
२०१६             ३५१           ११
२०१७            १५६१          १२९
२०१८             ५६३            ४०
२०१९           ३११०           २३९८

आॅक्टोबर महिन्यातील तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-

  • कोल्हापूर- हातकणंगले (२२१), शिरोळ (१९८), पन्हाळा (२९४), शाहूवाडी (२९०), राधानगरी (२४९), गगनबावडा (२८३), करवीर (२७२), कागल (२८२), गडहिंग्लज (२६७), भुदरगड (२०७), आजरा (२९५), चंदगड (२५२).
  • सांगली - इस्लामपूर (१७१), पलूस (२०३), तासगाव (२४५), शिराळा (२२५), मिरज (२५६), विटा (२५१), आटपाडी (२७५), कवठेमहांकाळ (३१०), जत (२९८), कडेगाव (१६७).

 

Web Title: Record-breaking rain in Kolhapur, Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.