मार्चअखेरपर्यंत वीज बिलांची थकबाकी वसुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:16+5:302021-03-18T04:24:16+5:30
कोल्हापूर : मार्चअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थकीत वीज बिलांची वसुली करा, असे आदेश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर यांनी ...
कोल्हापूर : मार्चअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थकीत वीज बिलांची वसुली करा, असे आदेश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर यांनी दिले. अखंडित वीजपुरवठा करण्यााठी ही वसुली होणे अत्यंत गरजेचे असल्याने कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीनेच काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या भादीकर यांनी कोल्हापूर परिमंडळ कार्यालयासह जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर विभागात संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंत्यांची थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. ‘कृषी धोरण २०२०’च्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन हे धोरण यशस्वी करण्यासाठी कृषी ग्राहकांना हे धोरण पटवून देत कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश दिले. या बैठकीस मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर उपस्थित होते.