सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:06 PM2019-07-13T15:06:23+5:302019-07-13T15:18:47+5:30

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले.

Release of various water conservation works at Basge | सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  

सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  

Next
ठळक मुद्देबसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  सेवावार्धिनी व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनची सामाजिक बांधिलकी

गडहिंग्लज  : गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले.

ओएनजीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय नंदनवार, ओएनजीसी कंपनीचे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू विक्रम पाटील व आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू  तारीफ अहमद यांच्या हस्ते जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले. यामध्ये मानिकेरी मळा येथे नवीन सिमेंट बंधारा, गोणी वसाहत येथील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरूस्ती व मजबुतीकरण तसेच गावातील गायरान जमिनीवर सलग समतल चर ही कामे पूर्ण झाली. ही कामे पाहून ओएनजीसीचे अधिकारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी ओएनजीसीचे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू विक्रम पाटील यांनी मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले,  खेळाडूंनी सराव करणे अत्यंत आवश्यक आहे, खेळामुळे व्यक्तीला प्रसिद्धी पैसे व आरोग्य यांचा लाभ होतो. यामुळे सर्वांनी खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.

ओएनजीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय नंदनवार यांनी बसर्गे ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल व सेवावार्धिनी संस्थेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना ओएनजीसीच्या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थित असलेल्या एस. एम. हायस्कूलच्या कबड्डी व फुटबॉल खेळाडूंना ओएनजीसी कंपनीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी विद्यार्थांना खेळाविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रास्ताविक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सेवावार्धिनी केलेल्या कामाची माहिती हर्षन पाटील यांनी दिली तर सेवावार्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन यांनी आभार मानले.

याप्रसंगी सेवावार्धिनीचे देवदत्त टेंभेकर, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, तलाठी रोहिदास आंधळे , ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, उपसरपंच सुरेश मनिकेरी आणि विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी,
एस. एम. हायस्कूलचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, आशा वर्कर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Release of various water conservation works at Basge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.