रेमडेसिविर चौकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:53+5:302021-04-20T04:24:53+5:30
गेल्या आठवड्याभरामध्ये केवळ खासगी रूग्णालयांकडून ८ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी करण्यात आली. परंतु, आतापर्यंत केवळ २ हजार इंजेक्शन्सचा पुरवठा ...
गेल्या आठवड्याभरामध्ये केवळ खासगी रूग्णालयांकडून ८ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी करण्यात आली. परंतु, आतापर्यंत केवळ २ हजार इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासकीय यंत्रणेला कंपन्यांकडून प्राधान्याने या इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात येतो. परंतु, खासगी रूग्णालयांना मात्र मागणीपेक्षा खूपच कमी पुरवठा होत आहे.
चौकट
१० हजारांहून अधिक इंजेक्शन्सचे पैसे जमा
जिल्ह्यातील विविध औषध दुकानदारांनी विविध कंपन्यांकडे १० हजारांहून अधिक रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी पैसे जमा केले आहेत. मात्र, उत्पादनच कमी होत असल्याने आधी पैसे भरूनही पाहिजे तेवढी इंजेक्शन्स मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
चौकट
नातेवाईक हतबल...
एकीकडे रेमडेसिविर आणा म्हणून डॉक्टर सांगतात. हे इंजेक्शन आणल्याशिवाय मी काही करू शकत नाही, असे ते स्पष्टपणे सांगतात. तर दुसरीकडे जादा पैसे देऊनही इंजेक्शन मिळत नाही. यामध्ये नातेवाईकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच इतके आपण हतबल झालो आहोत, अशी प्रतिक्रिया काही नातेवाईकांनी दिली.