गडहिंग्लजमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:13 PM2020-12-29T12:13:14+5:302020-12-29T12:17:09+5:30
gram panchayat Elecation Kolhapur- गडहिंग्लज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्यांच्या गावात ग्रामपंचायतीचे मैदान रंगणार आहे. एकूण ५ पैकी ३ जि. प. सदस्यांच्या तर एकूण १० पैकी ५ पं. स. सदस्यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात दिग्गज पदाधिकारी व सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्यांच्या गावात ग्रामपंचायतीचे मैदान रंगणार आहे. एकूण ५ पैकी ३ जि. प. सदस्यांच्या तर एकूण १० पैकी ५ पं. स. सदस्यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात दिग्गज पदाधिकारी व सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या गिजवणे, जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी तर अनिता चौगुले यांच्या औरनाळ गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पंचायत समितीच्या सभापती रूपाली गौतम कांबळे यांचे सासर तेरणी आणि माहेर हरळी बुद्रूक तर उपसभापती ईराप्पा हसुरी यांच्या खणदाळ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.
माजी सभापती जयश्री तेली यांच्या हसूरचंपूची, माजी उपसभापती बनश्री चौगुले यांच्या माद्याळची व पंचायत समिती सदस्या इंदू नाईक यांच्या हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.
जिल्हा परिषद सदस्य, मतदारसंघ आणि मतदारसंघातील निवडणूक लागलेली गावांची संख्या कंसात
जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणे (७), हेमंत कोलेकर - नेसरी (१३), राणी खमलेट्टी - भडगाव (७), रेखाताई हत्तरकी - हलकर्णी (१३), अनिता चौगुले- बड्याचीवाडी (१०)
पंचायत समिती सदस्य व त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक लागलेली गावांची संख्या कंसात
विठ्ठल पाटील - कडगाव (३), प्रकाश पाटील - गिजवणे (४), विजय पाटील - महागाव (४), श्रीया कोणकेरी - भडगाव (३), जयश्री तेली - बड्याचीवाडी (५), बनश्री चौगुले - नूल (५), विद्याधर गुरबे - नेसरी (३), इंदू नाईक - बुगडीकट्टी (१०), रूपाली कांबळे - हलकर्णी (९), ईराप्पा हसुरी - बसर्गे (४)
कोलेकर-हत्तरकींची कसोटी
जि. प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या नेसरी मतदारंसघातील १३ व रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी मतदारसंघातील १३ गावची निवडणूक लागली आहे.